कर्मयोगी शेषराव पाटील गायकवाड स्मृती प्रतिष्ठान:
ग्रामविकासाचे दीपस्तंभ असलेल्या कर्मयोगी शेषराव पाटील गायकवाड यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामसंस्कृती, शिक्षण, हरितक्रांती आणि सामाजिक एकोप्याला प्रोत्साहन देणारी अनेक लोकोपयोगी कामे केली. त्यांच्या दूरदृष्टीतून आणि अथक प्रयत्नांतून वाघोळा व परिसराच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी झाली. त्यांच्या जीवनकार्याची प्रेरणा घेत, त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देण्यासाठी “कर्मयोगी शेषराव पाटील गायकवाड स्मृती प्रतिष्ठान” कार्यरत आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचे संवर्धन व ग्रामविकासाचे कार्य पुढे नेले जात आहे. त्यांच्या जीवनपटाच्या प्रेरणादायी कहाणीचा हा प्रवास आता अधिक व्यापक स्वरूपात मांडण्यासाठी आम्ही ही वेबसाइट सादर करत आहोत.
या वेबसाइटच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा महिमा व त्यांच्या आदर्शांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हेतू आहे.